Home Breaking News Chandrapur city@ news • मायाताई कोसरेंच्या वडीलांचे नांव स्वातंत्र संग्रामच्या यादीत सर्वप्रथम...

Chandrapur city@ news • मायाताई कोसरेंच्या वडीलांचे नांव स्वातंत्र संग्रामच्या यादीत सर्वप्रथम क्रमांकावर!

217

Chandrapur city@ news
• मायाताई कोसरेंच्या वडीलांचे नांव स्वातंत्र संग्रामच्या यादीत सर्वप्रथम क्रमांकावर!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या नागपूर निवासी मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे यांनी काही दिवसांपूर्वी चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या आझाद बगीचाला भेट दिली होती.विशेष म्हणजे त्यांचे वडील डॉ.सखाराम कुचिनकर यांनी देश स्वातंत्र्य व्हावा यासाठी असहाय्य वेदना भोगून तुरुंगवास भोगला होता.ते चंद्रपूर जिल्ह्यातील एकच एक हातकडी सत्याग्रही होते .आज ही शहरातील आझाद बागेत लावण्यात आलेल्या स्मारकावर स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या यादीत प्रथम क्रमांकावर त्यांच्या वडीलांचे नांव नमूद आहे. हा आमच्या कुटूंबाचा बहूमान असल्याची प्रतिक्रिया मायाताई कोसरे यांनी आज एका संदेशात लिहली आहे.एव्हढेच नाही त्यांच्या पिताश्रींना भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते देशाच्या योगदानाबद्दल ताम्रपत्र देवून गौरविण्यात आले होते.मायाताई कोसरे स्वातंत्र संग्राम सैनिक डॉ.सखाराम कुचिनकर यांची एकुलती एक कन्या आहे.