◽◽वेड तुझे◽◽
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
🔳🔸वेड तुझे बघ
कसे मला लागे
आठवण तुझी
मनास लाजवे.
🔳🔸आर्त हाक तुला
मन माझे घाली
पाहताच तुला
येई हास्य गाली.
🔳🔸डोळीयात सख्या
सामावून तुला
अंतरंगात मी
जाणिले तुजला.
🔳🔸स्वप्नरंग माझ्या
अंतरी रंगले
प्रेमगीत तुझे
मनात धुंदले
🔳🔸केतकीच्या बनी
शोधिले तुजला
प्रेमरंगात मी
नाहीले मजला.
♦️🔸◽♦️वैशाली राऊत, सहज सुचलं सदस्य नागपूर




