Home Breaking News Bhadrawati taluka@ news • संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तालुकाध्यक्ष पदी...

Bhadrawati taluka@ news • संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तालुकाध्यक्ष पदी विजय वानखेडे यांची निवड

174

Bhadrawati taluka@ news
• संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या तालुकाध्यक्ष पदी विजय वानखेडे यांची निवड

✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी,भद्रावती

भद्रावती:भारतीय जनता पक्षात मागील कित्येक वर्षांपासून कार्यरत असणारे तसेच मांगली (रै) ग्रामपंचायत सदस्या पासून भाजप कार्यालय प्रमुख ते जिल्हा परिषद सदस्य, भाजपा अनु.जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष पद भूषविणारे आणी जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणारे भाजप चे कार्यकर्ते विजय वानखेडे यांची तहसील कार्यालय भद्रावती अंतर्गत येत असलेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकाऱी विनय गौडा चंद्रपूर यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना समितीच्या तालुका अध्यक्षपदी निवड केल्या बद्दल विजय वानखेडे यांनी पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर तसेच माजी जि.प.अध्यक्ष,भाजपा अध्यक्ष तथा राजूरा विधानसभा प्रमुख देवरावजी भोंगळे, भाजपा अध्यक्ष हरिश शर्मा व अन्य वरिष्ठ भाजपा पदाधिकारी यांचे आभार मानले