Home Breaking News • जागतिक पुरस्कार प्राप्त नामवंत कवयित्री अर्चना सुतार यांना मिळाला...

• जागतिक पुरस्कार प्राप्त नामवंत कवयित्री अर्चना सुतार यांना मिळाला “राष्ट्रीय गौरव” सन्मान पुरस्कार • मंथना नन्नावरे,वर्षा शेंडे,अर्पणा चिडे ,साक्षी बद्दलवार,माया बांगडे,प्रिती उमरे,रिना तेलंग,प्रतिभा पोहनकर,सरोज हिवरेंसह अनेकांनी केले सुतार यांचे अभिनंदन!

734

• जागतिक पुरस्कार प्राप्त
नामवंत कवयित्री अर्चना सुतार
यांना मिळाला “राष्ट्रीय गौरव” सन्मान पुरस्कार
• मंथना नन्नावरे,वर्षा शेंडे,अर्पणा चिडे ,साक्षी बद्दलवार,माया बांगडे,प्रिती उमरे,रिना तेलंग,प्रतिभा पोहनकर,सरोज हिवरेंसह अनेकांनी केले सुतार यांचे अभिनंदन!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

सातारा जिल्ह्यातील पाचवडच्या सुप्रसिद्ध कवयित्री ,लेखिका कु.अर्चना दिलीप सुतार यांना नागपूरच्या एकता फाऊंडेशन सामाजिक संघटन भारत यांच्या कडून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत “राष्ट्रीय गौरव सन्मान 2023″या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कु .सुतार ह्या माध्यमिक शिक्षिका असून आज पर्यंत त्यांचे समाजासाठी फार मोठे योगदान राहिले आहे .त्या स्वरचित कविता व लिखाणातून समाजकार्य करीत असतात. त्यांचे विविध विषयांवर विपुल प्रमाणात लेखन असून समाजाला ते अभिप्रेत आहे. त्यांच्या कोरोना या विषयावरील कवितांची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

या शिवाय त्यांना या पूर्वी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांने अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. अर्चना सुतार ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं काव्यकुंजच्या गेल्या अनेक वर्षांपासून सदस्य आहेत.त्यांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या सदस्य वर्षा शेंडे, अर्पणा चिडे,माया बांगडे, प्रिती उमरे,साक्षी बद्दलवार, प्रतिभा पोहनकर,सरोज हिवरे ,रिना तेलंग,अल्का सदावर्ते,किरण साळवी, किर्ती पांडे , प्रतिभा चट्टे,शिल्पा कांबळे मंथना नन्नावरे, विजया तत्वादी आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे