Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस बसस्थानका जवळील बंद असलेले नळ विवेक बोढे...

Ghugus city@ news • घुग्घुस बसस्थानका जवळील बंद असलेले नळ विवेक बोढे यांच्या पुढाकाराने सुरु

55

Ghugus city@ news
• घुग्घुस बसस्थानका जवळील बंद असलेले नळ विवेक बोढे यांच्या पुढाकाराने सुरु

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस: नवीन बस स्थानका जवळील पाण्याच्या टाकी लगतचे बंद असलेले नळ भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या पुढाकाराने सुरु झाले आहे.

बस स्थानका जवळील पाण्याच्या टाकी लगतचे पिण्याच्या पाण्याचे नळ काही दिवसापासून बंद होते.त्यामुळे जवळपास असलेल्या अनेक छोटया दुकानदारांना व मिनिडोर डग्गा चालकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लगत होता.

ही समस्या छोटया दुकानदारांनी व डग्गा चालकांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना सांगितली. लगेच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, छोटे दुकानदार व डग्गा चालकांनी बंद असलेल्या नळाची पाहणी केली. नळा लगतच्या जागेवर पाणी साचून घाण पसरली आहे असे निदर्शनास आले.

ही समस्या लक्षात घेत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्याशी संपर्क साधून ही समस्या सांगितली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

नगर परिषदतर्फे नळ सुरु करण्यात आले असून पाणी साचलेल्या ठिकाणी माती टाकण्यात आली आहे. त्याअनुषंगाने बस स्थानका जवळील छोटया दुकानदारांनी व डग्गा चालकांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी गजानन बोम्मावार, राजू वावरे, शंकर कटकुरवार, भास्कर गजेली, प्रभाकर डांगे, मोरेश्वर उलमाले, शेखर भोयर उपस्थित होते.