Home Breaking News Bhadravti taluka@ news • अबब!भला मोठा अजगर ! सर्पमित्रांनी दिले “त्यास” जीवनदान

Bhadravti taluka@ news • अबब!भला मोठा अजगर ! सर्पमित्रांनी दिले “त्यास” जीवनदान

49

Bhadravti taluka@ news
• अबब!भला मोठा अजगर ! सर्पमित्रांनी दिले “त्यास” जीवनदान

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

भद्रावती: चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील बेलगांव येथील एका शेतात एक भला मोठा अजगर निघाला.तो अजगर बघताच अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली होती.पण नंतर त्या अजगरास पकडले.सदरहु शेत भास्कर विरुटकर यांच्या मालकीचे असून दि.२९ऑगस्टला त्या अजगरला पकडण्यासाठी चंदनखेडा येथील सर्पमित्र मंडळी घटनास्थळी पोहचली.तो अजगर 9 फुट लांबीचा असून त्याचे वजन 10 किलो आहे. सर्पमित्र विकास गायकवाड,मयुर नन्नावरे,कुणाल ढोक,विजय खडसंग,अनुप येरणे,श्रीपात यांनी त्या अजगराला पकडून तो भद्रावतीच्या वनविभागाच्या परवानगीने (डिफेन्स )जंगल परिसरात सोडुन दिला.अर्थातच त्यांनी त्या अजगरास एक प्रकारे जीवनदान दिले.