Ballarpur city news
• ओबीसीचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडावा अन्यथा राज्यसरकारला ओबीसी जनगणना समितीकडून भीक मागून निधी देण्याचा इशारा
सुवर्ण भारत :संजय घुग्लोत(उपसंपादक)
बल्लारपूर :- आज 4 सप्टेंबर रोजी ला राज्यभरात ओबीसी, व्हिजे,एनटि, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी 72 वस्तीगृह सुरू करणे, स्वाधारच्या धरतीवर आधार योजना राबविणे आणि परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या 75 करणे,हे विद्यार्थ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.या तिन्ही योजना येत्या 11 सप्टेंबर पर्यंत सुरू न झाल्यास 12 सप्टेंबरला भिकारी असलेल्या सरकारच्या विरोधात राज्यभरात भीक मागो आंदोलन केले जाईल आणि आणि यातून जमा होणारी निधी राज्य सरकारच्या वित्त विभागाला मनी ऑर्डर द्वारे पाठवल्या जाईल, असा इशारा ओबीसी,व्हिजे ,एनटी, एसबीसी ओबीसी समन्वय समिती, बल्लारपूर व्दारे नायब तहसीलदार सतीश साळवे बल्लारपूर यांच्या मार्फत मुख्यमंत्री , अर्थमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, सचिव ईतर मागास बहुजन कल्याण विभाग व व वित्त विभाग यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
निवेदन देताना सुधीर कोरडे, शंकर काळे, उमेश कडू, विवेक खुटेमाटे, केशव थिपे, अमोल काकडे, रणजीत धोटे, आकाश दुर्गे, मनोज देरकर, बादल उराडे, भास्कर वडस्कर, उमेश शेंडे, पराग जांभुळकर सह ओबीसी समन्वय समिती पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


