Home Breaking News ◽🔸शिक्षक दिन विशेष ◽🔸आमचे शिक्षक….. आमचे गुरु…..! ...

◽🔸शिक्षक दिन विशेष ◽🔸आमचे शिक्षक….. आमचे गुरु…..! 🟡◽सौ. सरोज वि. हिवरे सहज सुचलं काव्यकुंज

145

◽🔸शिक्षक दिन विशेष
◽🔸आमचे शिक्षक….. आमचे गुरु…..!

🟡◽सौ. सरोज वि. हिवरे
सहज सुचलं काव्यकुंज

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

◽♦️आमच्या अंधाऱ्या जीवनाला ज्ञान रुपी प्रकाश दिला तुम्ही,
वेगवेगळे शिक्षण देऊन आम्हाला घडविले तुम्ही,
तुमच्या सारखे गुरु मिळाले, धन्य झालो आम्ही…..

◽♦️सत्य काय असत्य काय याचे ज्ञान दिले तुम्ही,
सर्वांचा आदर करून, प्रेमाने वागून सत्याच्या मार्गावर चालायला शिकविले तुम्ही,
तुमच्या सारखे गुरु मिळाले धन्य झालो आम्ही….

◽♦️कधी प्रेमळ होऊन आशेचा किरण दाखविला तर कधी कडक होऊन धाडस करण्याचा मार्ग दाखविला तुम्ही,
◽♦️सदैव आमच्या सोबत राहून आम्हाला यशाच्या उंच शिखरावर पोहचविले तुम्ही,
तुमच्या सारखे गुरु मिळाले धन्य झालो आम्ही…..

◽♦️अज्ञान रुपी मातीच्या गोळ्याला, ज्ञान रुपी कुंभार होऊन योग्य आकार दिला तुम्ही,
तुमच्या सारखे गुरु मिळाले धन्य झालो आम्ही… धन्य झालो आम्ही……