Home Breaking News Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरात ट्रक च्या धडकेत शिक्षिका अनिता मत्ते...

Chandrapur city@ news • चंद्रपूर शहरात ट्रक च्या धडकेत शिक्षिका अनिता मत्ते ठार!

128

Chandrapur city@ news
• चंद्रपूर शहरात ट्रक च्या धडकेत शिक्षिका अनिता मत्ते ठार!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर :- (०४ सेप्टेंबर २०२३) चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने दुचाकीला धडक दिली, या धडकेत दुचाकीवरील शिक्षिका जागीच मृत्यू झाला.

शिक्षिका अनिता ठाकरे ह्या शाळेत जाण्यासाठी निघाल्या होत्या, चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ अचानक भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक क्रमांक RJ11 GC0824 ने ठाकरे यांच्या दुचाकी वाहन क्रमांक MH34 BS4977 ला धडक दिली. या धडकेत शिक्षिका ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला, धडक दिल्यावर ट्रक चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

मृतक 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे ह्या प्रा. किशोर ठाकरे जनता महाविद्यालय यांच्या पत्नी असून श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर येथे राहत होते, त्या जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.