Home Breaking News Ghugus city @news • यंग चांदा बिग्रेडच्या वतीने शिक्षक दिन साजरा

Ghugus city @news • यंग चांदा बिग्रेडच्या वतीने शिक्षक दिन साजरा

243

Ghugus city @news
• यंग चांदा बिग्रेडच्या वतीने शिक्षक दिन साजरा

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळा(कन्या) येथे यंग चांदा बिग्रेडच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर अलडवार यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच सर्व शिक्षकांना, शिक्षक दिवसाचा हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

आज शिक्षक दिन राज्यभरात साजरा करण्यात आला.यंग चांदा बिग्रेडच्या वतीने आज घुग्घुस येथील जि.प.उच्च प्राथमिक कन्या मुलींचा शाळेत शिक्षक दिनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी यंग चांदा बिग्रेड शहर महिला प्रमुख सौ.उषाताई गौतम आगदारी, कामगार संघटक वनिता निहाल,कुणबी समाज अध्यक्ष संध्या जगताप, जोत्सना मस्के,कामिनी देशकर, शशिकला काशे, भारती सौदारी,माया मांडवकर, विद्या दुबे,राजू सूर्यवंशी, ईलशाद शेख तसेच शाळेचे शिक्षक व मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होती.