Home Breaking News Ballarpur city@ news • महात्मा फुले महाविद्यालयत शिक्षक दिन साजरा

Ballarpur city@ news • महात्मा फुले महाविद्यालयत शिक्षक दिन साजरा

198

Ballarpur city@ news
• महात्मा फुले महाविद्यालयत शिक्षक दिन साजरा

✍️संजय घुग्लोत
सुवर्ण भारत:उपसंपादक

बल्लारपूर :- महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी आज शिक्षक दिन साजरा केला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त इंग्लिश मीडियम कॉमर्स अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन नुसार आपापल्या वर्गामध्ये अनेक विषय घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका कशी असते त्यानुसार वर्ग शिक्षिका बनल्या. त्यांच्या कला गुण प्रमाणे त्यांना पुरस्कार देण्यात आले. 11 अकरावी ची गायत्री पांबी हिने प्रथम आणि जेसिका मातंगी ने द्वितीय पुरस्कार प्राप्त केला तसेच बारावीची माही कौर आणि रिया मारपे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त केला. या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमा करिता प्रमुख अतिथी एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. योगेश टेकाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागाचे प्रा. सनी मेश्राम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा मसादे मॅडम यांनी केले.