Ballarpur city@ news
• बल्लारपूर शहरात थाटात पार पडला जन्माष्टमी उत्सव !
सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)
बल्लारपूर : स्थानिक विद्यानगर वॉर्ड येथील पंचशील चौकात दि. ७ सप्टेंबरला कृष्णा जन्माष्टमी निमित्त दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनाचे अध्यक्ष समीर केणे, मनसे उपजिल्हा प्रमुख विष्णू बुजोणे अरुण वाघमारे, उमेश कुंडले ,योगेश गोरडवार आदिं उपस्थित होते. पंचशील चौक मित्र मंडळाचे बादल मेश्राम, नागेश तोडसाम. आकाश मेश्राम. देवांशू जिवणे. चैतन्य समदुलवार. मनोज तोडसाम. अमोल भंडारे. हर्ष कोतपली. सतीश वासलवार. संतोष कोतपल्लीवार शुभम कंनोजवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले .
