Ghugus city @news
• घुग्घुस शहरातील भारतीय बौद्ध महासभा शाखा विहार बांधकामास धम्मदान
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
घुग्गुस:दि.९ शनिवार २०२३ रोजी स्मृतीशेष विशाल भारत लोहकरे यांचा दिवस न करता त्यांच्या मोठीताई श्रीमंती किरणताई दुधगवळी यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा घुग्घुचे विहार बांधकामास पाच हजार रुपये दान देण्यात आले.
भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव,बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे,कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी आखलेली संकल्पना की आपण वाढदिवस,तिसरा दिवस, लग्नाचा वाढदिवस व अनेक लहान मोठे कार्यक्रम करुन आपण खुप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो आणि त्यामधुन साध्य काहीच होत नाही.
म्हणून आपण हा पैसा खर्च नकरता समाजाला दान दिला तर त्या दानातील पैशाचा योग्य वापर करून समाजाची चळवळ उभी होईल
या वेळेस भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुगुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव ,माजी अध्यक्ष मा.दिगांबर बुरड विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे, कार्याध्यक्ष चन्द्रगुप्त घागरगुंडे,सागर लोहकरे समाज बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते.