Home Breaking News Mul taluka @news • कवयित्री वृंदा पगडपल्लीवार झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

Mul taluka @news • कवयित्री वृंदा पगडपल्लीवार झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

227

Mul taluka @news
• कवयित्री वृंदा पगडपल्लीवार झाडी शब्दसाधक पुरस्काराने सन्मानित

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मूल:झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामीण) व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा वरोरा, जिल्हा चंद्रपूर, तर्फे दरवर्षी झाडी शब्दसाधक पुरस्कार देऊन बोलीभाषेवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकास गौरविण्यात येते. यावर्षीचा झाडी शब्दसाधक पुरस्कार कवयित्री वृंदा पगडपल्लीवार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन झाडी शब्दसाधक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पगडपल्लीवार या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनासुर्ला,मूल येथे येथे कार्यरत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या झाडी शब्दसाधक पुरस्कार वितरण सोहळ्यात आनंदवन येथे हा पुरस्कार वृंदा पगडपल्लीवार यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला डॉ. विकास आमटे, पद्मश्री विभूषित परशुराम खुणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. सुधाकर कडू, ना.गो.थुटे,रत्नमाला भोयर, पंडित लोंढे, आदिं उपस्थित होते.