Home Breaking News ◽🏵️चार ओळी◻️🏵️ ◽🔶सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई

◽🏵️चार ओळी◻️🏵️ ◽🔶सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई

68

◽🏵️चार ओळी◻️🏵️

◽🔶सुनंदा पाटील सहज सुचलं मार्गदर्शिका मुंबई

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

मी गाते चांदणवेळी
कवितेच्या संध्यारागा
मग पहाट होता फुलती
किती गूढ फुलांच्या बागा
◽◽◽◽◽◽◽

मी थांब म्हणाले तेव्हा
कवितेला रुसवा आला
प्रत्येक श्वास माझाही
कवितेचा साजण झाला
◻️◻️◻️◻️◻️◻️◻️

रसिकास सांगते आता
तुजपुढे ठेवली कविता
दे आशिष या काव्याला
लाडाची माझी दुहिता
◻️◻️◻️◻️◻️◻️◻️

मी नवीन कवितेसंगे
भेटाया येईन फिरुनी
शत घटही साहित्याचे
कवितांनी जाती भरुनी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺