Home Breaking News Chandrapur city@ news •संघादिपती ममता ठाकूर यांनी घेतली चंद्रपूरच्या अम्माची भेट !...

Chandrapur city@ news •संघादिपती ममता ठाकूर यांनी घेतली चंद्रपूरच्या अम्माची भेट ! • टिफिन उपक्रमाचे ही केले त्यांनी तोंडभरून कौतुक !

81

Chandrapur city@ news
•संघादिपती ममता ठाकूर यांनी घेतली चंद्रपूरच्या अम्माची भेट !
• टिफिन उपक्रमाचे ही केले त्यांनी तोंडभरून कौतुक !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:अखिल भारतीय मतुआ महासंघाच्या देशाच्या प्रमूख संघादिपती तथा पश्चिम बंगालच्या माजी खासदार ममता ठाकूर यांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी येत गंगुबाई अर्थात चंद्रपूरच्या अम्मा यांची भेट घेत अम्मा का टिफिन या उपक्रमाचे कौतुक केले आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, गोविंद मित्रा, पूष्पा देवनाथ यांचीही उपस्थिती होती.
चंद्रपूर मतदार संघचे अपक्ष आमदार जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात अम्मा का टिफिन हा उपक्रम राबविल्या जात आहे. सदरहु उपक्रमाअंतर्गत शहरातील अत्यंत गरजू व्यक्तीच्या घरी दररोज जेवणाचा डब्बा पोहोचविल्या जात आहे. यासाठी विशेष टिम तयार करण्यात आली आहे. उपक्रम सुरु झाल्या पासून एकदाही यात खंड पडलेला नाही. नियमीत हे सेवा कार्य सुरु असून या उपक्रमाअंतर्गत गरजुंना मायेचा घास भरविल्या जात आहे.
आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांनी टोपल्या विकुन आपल्या परिवराला सक्षम केले आहे. मुलगा आमदार झाल्या नंतर सदरहु उपक्रम सुरु करण्याबाबत त्यांनी मुलाला सांगितले होते. अम्मा आजही टोपल्या विकुन यासाठी लागणा-या खर्चातही आपला सहभाग देत आहे. या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक केल्या जात असतांना आता पश्चिम बंगालच्या माजी खासदार तथा अखिल भारतीय मतूआ महासंघाच्या प्रमूख संघादिपती ममता ठाकूर यांनी आज गुरुवारी आमदार जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत अम्माची भेट घेतली. यावेळी त्यांनी सदरहु उपक्रमाबदल संपुर्ण माहिती जाणून घेतली. सेवा भावनेतून सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असुन भुकेल्याला भोजन देण्याचे पुणण्याचे काम या उपक्रमातुन होत असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या. तसेच त्यांनी यावेळी या उपक्रमाला आपल्या शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी त्यांनी कुंभमेळा नंतर पश्चीम बंगाल येथे मतुआ महासंघ यांच्या वतीने दरवर्षी आयोजित होणा-या महामेळाव्या करीता येण्याचे जोरगेवार कुटुंबीयांना आमंत्रण दिले. आमदार जोरगेवार यांनीही आँक्टोंबर महिण्यात होत असलेल्या श्री. माता महाकाली महोत्सवाचे निमत्रंण ममता ठाकूर यांना दिले आहे.