Home Breaking News ◼️♦️ धुक्यात हरवले स्वप्न! 🏵️◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य...

◼️♦️ धुक्यात हरवले स्वप्न! 🏵️◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य ठाणे

79

◼️♦️ धुक्यात हरवले स्वप्न!

🏵️◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य ठाणे

सुवर्ण भारत:किरण घाटे( उपसंपादक)

धुक्यात हरवले स्वप्न माझे
जे होते हृदयी जपलेले
असे घडले अघटीत
निसटून सारे गेले //१//

स्वप्न पाहिले होते
तुझ्या सवे जगण्याचे
एका क्षणात ‌झाले
धुसर स्वप्न जीवनाचे //२//

स्वप्न भविष्याचे, उंच भरारी
गगनात घेण्याचे पाहिले नयनी
प्रयत्नांची केली परकाष्टा
पण गेले स्वप्न धुक्यात विरूनी//३//

धुक्यात अडखळली पाऊले
पण तोल सावरत होते
धुक्यात हरवलेल्या स्वप्नांना
मी मात्र पूर्ण करण्या धडपडते // ४//