Home Breaking News ◻️🔸◻️ती रोजनिशी… 🔸🏵️🔸कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

◻️🔸◻️ती रोजनिशी… 🔸🏵️🔸कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

73

◻️🔸◻️ती रोजनिशी…

🔸🏵️🔸कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

रोजनिशी एका शेतकऱ्याची
चाळतांना मन झाले थक्क !
त्यात स्पष्ट – स्पष्ट लिहिले होते
निसर्गाने हिसकावले त्याचे हक्क||1||

उडिद – मूग पेरला त्याने तेव्हा
पीक बहरून सोनं झालं !
अचानक पाऊस सैतान झाला
डोळ्यांत त्याच्या पाणी आलं
||2||

तशाच मोठ्या हिंमतीने ,
भाऊने कपाशी पेरली खरी
लागला करपा गेली कपाशी
आता बिचारा काय करी?
||3||

घेतला दोर,झाडाला टांगला
हले त्याच्या जीवनाचा झुला
शेवटच्या पानावर होता त्याने
केला जीवनाचा इतिहास खुला!||4||