Home Breaking News ♦️शिक्षणाचे खासगीकरण♦️ ♦️◻️शिक्षणाची लागली वाट…! 🏵️🔸🏵️कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा,...

♦️शिक्षणाचे खासगीकरण♦️ ♦️◻️शिक्षणाची लागली वाट…! 🏵️🔸🏵️कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

131

♦️शिक्षणाचे खासगीकरण♦️
♦️◻️शिक्षणाची लागली वाट…!

🏵️🔸🏵️कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

शिक्षणाचे खासगीकरण नव्हे
शिक्षणाची लागली वाट !
महागडे होईल शिक्षण आता
हुशार मुलांचा जाणार थाट
||1||
अनेक जाती – जमाती बघा!
सवलतीत शिक्षण घेतात ,
मजुरीला आई – बाप जातात
तरी मुलांना शिक्षण देतात
||2||
कमी पैशात शिक्षण घेणे ,
असते त्यांना शक्य !
पण खाजगीकरणामुळे ते
होणार आता अश्यक्य!||3||

परिस्थितीने जे आहेत लाचार
त्यांनी कसं शिकायचं सांगा?
जिकडे तिकडे श्रीमंतांनीच
लावायच्या आता रांगा !||4||

शिष्यवृत्ती पण गेली तर ,
कोणता राहील मुलांना आधार!
कंटाळलेली अनेक बिचारी ,
घेतील जीवनात माघार!||5||