Home Breaking News ♦️◻️मयतीला ये पोरी ♦️ ♦️◽नवनाथ सरोदे ,आंबी दुमाला

♦️◻️मयतीला ये पोरी ♦️ ♦️◽नवनाथ सरोदे ,आंबी दुमाला

532

♦️◻️मयतीला ये पोरी ♦️

♦️◽नवनाथ सरोदे ,आंबी दुमाला

जमलं तर ये पोरी
बापाच्या मयतीला /
एकटी नको येऊ तू
नवराही आण सोबतीला //

बापा पेक्षा तोच तुला
जीव लावणारा दिसला गं /
पळून गेलीस म्हणूनच
बाप तुझ्यावर रूसला गं //

अठरा वर्ष सांभाळलय
तळ हाताच्या फोडावानी /
येऊ नव्हतं दिलं कधी
डोळ्यात तुझ्या पाणी //

जे जे मागायचीस पोरी
ते ते द्यायचा मी /
तुझीच हौस पुरवायला
भीक मागायचा मी //

बॅंकेत जाऊन बघ एकदा
लाखो रूपये तुझ्या नावावर /
तुझ्याच साठी कमवलेत पोरी
उदार होऊन जिवावर //

दोष तुझा नाय पोरी
दोष तर माझाच हाय /
तू कधी वयात आली
मलाच कळलं नाय //

चूक माझीच झाली
तुला शिकवली शाळा /
हुशार झाली म्हणून का
केसानं कापला गळा //

ये आता रडत बोंबलत
पप्पा पप्पा म्हणत /
सरणावर आपटून डोकं
बस आता कण्हत //

पोरी तुला जगातलं
सारं सुख मिळू दे /
तुझ्याच हातान मात्र
सरण माझं जळू दे //..