Home Breaking News Chandrapur city@ news • वीज केंद्रातील कुणाल कंपनीचा मनमानी कारभार परत एकदा...

Chandrapur city@ news • वीज केंद्रातील कुणाल कंपनीचा मनमानी कारभार परत एकदा चव्हाट्यावर ! •कामगारांचे वेतन थकविले ; कामगार आंदोलन करण्याच्या विचारात ! •अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने होत आहे कामगारांचे शोषण राजु झोडेंचा आरोप !

117

Chandrapur city@ news
• वीज केंद्रातील कुणाल कंपनीचा मनमानी कारभार परत एकदा चव्हाट्यावर !
•कामगारांचे वेतन थकविले ; कामगार आंदोलन करण्याच्या विचारात !
•अधिकारी व कंत्राटदार यांच्या संगनमताने होत आहे कामगारांचे शोषण राजु झोडेंचा आरोप !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सह संपादक

चंद्रपुर:चंद्रपुर महाऔष्णिक वीज केंद्रातील कुणाल नावाच्या खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांचे वेतन थकल्याने या कंपनीचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आला आहे.अश्या या कारभारामुळे कामगारांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या ह्या संतापजनक कारभारामुळे वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी यांच्या विरोधात आंदोलन का उभे करण्यात येवू नये? असा संतप्त सवाल उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज उपस्थित केला आहे.

कामगारांचे वेतन नियमित देण्यात यावे, 10 तारखेच्या आत कामगारांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, कामगारांचे पीएफ वेळेत भरण्यात यावे यासह विविध मागण्यांना घेऊन उलगुलान संघटनेने मागील महिन्यात मेजर गेट समोर आमरण उपोषण सुरू केले होते.त्यानंतर वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनीच्या व्यवस्थापकांनी आंदोलन स्थळी भेट देत कामगारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.तसे लेखी पत्र सुद्धा दिले.मात्र आता 10 तारीख लोटून गेल्यानंतर सुद्धा कामगारांचे वेतन न मिळाल्याने कामगार वर्गात रोष व्यक्त करण्यात येत आहे.वीज केंद्र प्रशासन व कुणाल कंपनी तुपाशी आणि कामगार मात्र उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे परत एकदा कामगारांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे, रवि पवार श्याम झिलपे मंगेश बदकल, गुरु भगत ,सुमित भिमटे अक्षय काकडे ,सुरज जोगी ,पंकज इंगोले प्रफुल्ल पाटील यांनी आज दिला आहे.