Home Breaking News Chandrapur dist@ news • नेरी व्यापारी असोसिएशनचा अनोखा पारिवारिक स्नेह मिलन सोहळा!...

Chandrapur dist@ news • नेरी व्यापारी असोसिएशनचा अनोखा पारिवारिक स्नेह मिलन सोहळा! •अनेक मान्यवरांची उपस्थिती!

140

Chandrapur dist@ news
• नेरी व्यापारी असोसिएशनचा अनोखा पारिवारिक स्नेह मिलन सोहळा!
•अनेक मान्यवरांची उपस्थिती!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चिमूर : तालुक्यातील नेरी येथे शहर व्यापारी असोसिएशनचा वतीने पारिवारिक स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याच कार्यक्रमात अनेक मान्यवर मंडळींचा सत्कार करण्यात आला. रविवारला गुरुदेव सेवा मंडळाच्या सभागृहात हा अनोखा सोहळा पार पडला. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ,गीत गायन , उखाणे आदिं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

आपले विश्व आगळ्या वेगळ्या विश्वात भेटलो, नवरत्न महासागरी अभिमानाने जगलो, ताठर कणा नजरेत बाणा, मधुर वाणीने विश्व जिंकलो!
छेडील्या तारा स्नेहाच्या, आले जुळणी सुर मिलनाचे, छेडल्या तारा मनातील गुपितांच्या, बरसुनी वर्षा स्वागत सगळ्यांचे, चिंब भिजली मने स्नेहमिलनात जणू असाच भारावलेला एक देखावा सभागृहात उमटला होता.या अनोख्या स्नेह संमेलनाचे संयोजक होते व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्यगण!यांनी आयोजित केलेला हा स्नेहमिलनाचा सोहळा खरोखरच वाखाण्याजोगा होता. व्यापारी असोसिएशनचे मंगेश चांदेकर, सुरेश पिसे , राजू पिसे, रवींद्र चुटे, विलास पिसे व अन्य सदस्यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा आखली होती .या कार्यक्रमाचे सुरेख संचालन शैला पिसे व दिपा कराडे यांनी संयुक्तीकपणे केले .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान धनराज मुंगले यांनी विभूषित केले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखा पिसे दादाराव पिसे,राजेश शाहू,सदानंद खत्री ,महेश डेंगानी ,प्रवीण सातपुते, बबन बनसोड उपस्थित होते.आयोजित कार्यक्रमात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडीया, जेष्ठ नाट्यकलावंत सुरेश कामडी, रवींद्र पंधरे ,निखिल पिसे ,बबलू मोगरे यांचा व्यापारी असोसिएशन तर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार बंटी भांगडिया यांना व्यापारी असोसिएशन तर्फे विविध मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले . सदरहु मागण्या लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही आमदार भांगडीया यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण मंडळाचे अध्यक्ष मंगेश चांदेकर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पिसे यांनी केले, तर उपस्थितीतांचे आभार राजू पिसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र चुटे सुरेश पिसे , गुलाब कामडी , विलास चांदेकर , बापूराव पिसे, दिलीप फाये, अशोक पिसे, चांदखा पठाण,शैलेश शेनमारे , मिलिंद वाघे, राजू पिसे, धनराज पंधरे ,जगदीश पराते,विनोद कामडी,देवा कामडी यांनी अथक परिश्रम घेतले.सदैव स्मरणात राहावा असा हा अनोखा सोहळा सर्वांच्या साक्षीने पार पडला.