Chandrapur dist@ news
• चंद्रपूरच्या बाबुपेठ मध्ये झाडू यात्रेचे जंगी स्वागत
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सह संपादक
चंद्रपुर:विदर्भातील जनसंपर्क वाढविण्याकरिता दि. 02 ऑक्टोबर 2023 ला गांधी जयंती निमित्त आम आदमी पार्टी तर्फे झाडू यात्रा रॅलीला सुरुवात झाली. या यात्रेचे आज बाबुपेठला आगमन झाले. आपचे राजु कुडे यांच्या अध्यक्षतेखाली आपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी करत या जंगी यात्रेचे स्वागत केले.
यावेळी आपचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे, राज्याचे संघटक संदिप देसाई, राज्याचे संघटक भूषण ढाकुलकर उपस्थित होते.
कुडे यांनी राज्य पदाधिकाऱ्यांना बाबुपेठ मधील आपच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी बाबुपेठ मधून आम आदमी पार्टी येणाऱ्या निवडणुकीत उत्तम प्रदर्शन करेल अशी आशा व्यक्त केली.
राज्य पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण बाबुपेठ टीमचे या वेळी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर ते पदाधिकारी बल्लारपूर कडे रवाना झाले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष मयूर राईकवार, सुनील मुसळे, योगेश गोखरे, संतोष बोपचे, राजेश चेडगुलावार, सुनिल भोयर, संतोष दोरखंडे, दिनेश मेश्राम, जयदेव देवगडे, अनुप तेलतुंबडे, सागर बोबडे, अक्षय गोवर्धन, शंकर मरसकोल्हे, दिपक चुणारकर, संदिप कुडे, नितेश कामतकर, अशोक अंबागडे, अंकुश ब्राम्हने, भिमराज बागेसार, अजय बाथव, कालिदास ओरके, मेंढेकर तसेच बाबुपेठ मधील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.




