Home Breaking News ⬜🌺⬜आभास तुझा होता……………………….! 🟣🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

⬜🌺⬜आभास तुझा होता……………………….! 🟣🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

48

⬜🌺⬜आभास तुझा होता……………………….!

🟣🌺कु.मनिषा भिमराव बिऱ्हाडे पाचोरा, जळगांव

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

आभास तुझा होता
मन वेडे बावरते ,
कोंब मनात प्रितीचे
मी मलाच सावरते !||1||

वसंत प्रेमाचा हिरवा
हृदयात जणू फुलतो
लाजेने गाल गुलाबी
चेहरा हसून खुलतो||2||

डोळ्यांत अंजन कोर
वाट तुझी पाहते !
आभास तुझा होता,
माझी न मी राहते!||3||

फुलांत तुझाच चेहरा
दिसतो हसतांना !
हातात हात घेतो ,
नदीकाठी बसतांना!||4||