Home Breaking News Chandrapur dist@ news • एसीबीच्या जाळ्यात अडकल्या महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी...

Chandrapur dist@ news • एसीबीच्या जाळ्यात अडकल्या महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी ! • मूल मधील घटना!

133

Chandrapur dist@ news
•एसीबीच्या जाळ्यात अडकल्या महिला दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी !
•मूल मधील घटना!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल : येथील प्रभारी दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी यांना तब्बल दहा हजार रुपयांची लाच घेताना चंद्रपूर एसीबी पथकाने अटक केल्याची घटना नुकतीच घडली.लाच घेणे व देणे हा कायद्याने गुन्हा असतांना व शासकीय कार्यालयातील प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात फलक लावल्यावर देखील वैशालीना लाचेचा मोह टाळता आला नाही शेवटी त्या लाचलूचपत प्रतिबंधक खात्याचा पथकाने रचलेल्या सापळ्यात अलगद अडकल्या! विशेष म्हणजे मारोडा येथील एका पक्षकारास त्यांनी तब्बल १५ हजारांची लाच मागितली होती.नंतर तो सौदा दहा हजार रुपये देण्यात पक्का झाला.पक्षकाराच्या मनात ही लाच देण्याची मुळीच इच्छा नव्हती.त्यांनी थेट चंद्रपूर एसीबी कडे धाव घेतली व तक्रार नोंदवली.तक्रार प्राप्त होताच लाचलूचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कुठलाही विलंब न लावता सापळा रचला त्यात वैशाली मिटकरी अलगद अडकल्या!

काही वेळातच मूल नगरीत वा-यासारखी बातमी पसरली.चहाटपरी , हाॅटेल व पानठेल्यांवरती चर्चा रंगू लागली.काहींनी या कारवाईचे स्वागत केले तर काहींनी आनंदोत्सव साजरा केला.खरेदी विक्री प्रकरण, मुद्रांक शुल्क फी या संदर्भात ही घटना घडल्याचे बोलल्या जाते . शासकीय फी व्यतिरिक्त वैशाली यांनी अधिकची रक्कम मागितली होती.ती पण चक्क १५ हजार रुपये! पण नंतर तडजोडी नंतर हा सौदा झाला १० हजार रुपये देण्यात! शेवटी नशीब फुटले व वैशाली एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकल्या ! नागपूरचे पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर,अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत पाटील, हिवराज नेवारे,वैभव गाडगे,अमोल शिडाम , पुष्पा काचोळे,व पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली.दरम्यान मूलकरांनी एसीबीच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.