Home Breaking News Gadchiroli dist@ news •सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप

Gadchiroli dist@ news •सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप

70

Gadchiroli dist@ news
•सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लॅंकेट वाटप

सुवर्ण भारत:रोशनी बैस(उपसंपादक)

अहेरी:-सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी येथील उप जिल्हा रुगणालयात फळ,बिस्कीट आणि ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

31ऑक्टोबर हा दिवस कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची कनिष्ठ कन्या,सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांचा वाढदिवस नेहमीच मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.आज सकाळपासूनच ताईंचा वाढदिवसानिमित्त राज परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्यासाठी रांग लावली होती.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.यावर्षी सुद्धा विविध उपक्रम साजरा करतानाच त्यांनी शुभेच्छा स्वीकारत आज उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना थंडीपासून बचाव व्हावं या उदात्त हेतूने ब्लॅंकेट तसेच फळ, बिस्कीट वाटप केले.यावेळी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.