Home Breaking News Nagpur city@ news • नागपूरला अनेकांच्या उपस्थितीत पार पडला कोजागिरी पौर्णिमेचा ...

Nagpur city@ news • नागपूरला अनेकांच्या उपस्थितीत पार पडला कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम !

228

Nagpur city@ news
• नागपूरला अनेकांच्या उपस्थितीत पार पडला कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

नागपूर : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती सभागृहात नुकताच कोजागिरी (पौर्णिमेचा) एक कार्यक्रम उत्साहात पार पडला.आयोजित कार्यक्रमाला प्रथम पद्मश्री माजी राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे , डॉ. सुनिता महात्मे महादेवराव पातोंड, वंदना विनोद बरडे , डॉ. ढवळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती लाभली होती.
या वेळी बच्चेकंपनी, पुरुष मंडळी ,महिलांची संगीत खूर्ची‌ व प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. वंदना बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे या प्रसंगी आयोजन करण्यात आले होते.अश्विनी उरकुडे व संजीवनी घुरडे यांनी परिक्षक म्हणून आपली जबाबदारी सांभाळली. याच कार्यक्रमात महिलांनी या निमित्ताने गरब्याचा मनमुराद आनंद लुटला. ९० वर्षांपर्यंतच्या महिलाही या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
सदरहु कार्यक्रमासाठी महादेवराव पातोंड, डॉ .विनोद बरडे,शरद उरकुडे, अनिल तांबडे, वंदना बरडे, अश्विनी उरकुडे, संजीवनी घूरडे,कामीनी तवलै,विनीता पुनसे ज्योती कापळे, यांनी अथक परिश्रम घेतले.आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वंदना बरडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार शरद उरकुडे यांनी मानले. कोजागिरी कार्यक्रमाला अनेकांची उपस्थिती लाभली होती.