Home Breaking News Chandrapur dist@ news • श्री साई कॉन्व्हेन्ट व जिविका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या...

Chandrapur dist@ news • श्री साई कॉन्व्हेन्ट व जिविका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जान्हवी तिखटनी प्राप्त केला वकृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक

340

Chandrapur dist@ news
• श्री साई कॉन्व्हेन्ट व जिविका इंग्लिश मिडीयम स्कूलच्या जान्हवी तिखटनी प्राप्त केला वकृत्व स्पर्धेत व्दितीय क्रमांक

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:मेरी मिट्टी मेरा देश या शासनाच्या अभियाना अंतर्गत
राष्ट्रीय विद्यालय चिमूर येथे तालुकास्तरीय एक स्पर्धा घेण्यात आली होती. सदरहु स्पर्धेत जिविका इंग्लिश मिडीयम स्कूल भिसीची कु. जान्हवी मंगेश तिखट या विद्यार्थिनीने तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला .त्या निमित्ताने आंबेनेरी केंद्राच्या वतीने केंद्र प्रमुख ताराचंद रामटेके यांच्या हस्ते या विद्यार्थिनीचा सत्कार व सन्मान करण्यात आला .तसेच सैनिकी स्कूल चंद्रपूरचा विद्यार्थी ग्रीष्म ताराचंद रामटेके यांनी या शाळेत येऊन भेट दिली त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले .
रामटेके यांनी विद्यार्थांना सैनिकी स्कूल बाबत माहिती दिली . तद्वतच त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना या वेळी मार्गदर्शन केले .