Home Breaking News Chandrapur dist@ news • वाघांच्या चित्तथरारक झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक...

Chandrapur dist@ news • वाघांच्या चित्तथरारक झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी

250

Chandrapur dist@ news
• वाघांच्या चित्तथरारक झुंजीत एका वाघाचा मृत्यू तर एक वाघ गंभीर जखमी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:ताडोबा बप्पर झोन खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत वहानगांव येथे दोन वाघांच्या चित्तथरारक झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला तर एक वाघ गंभीर रित्या जखमी झाल्याचे वृत्त आहे.घटनासथळी तो वाघ अद्यापही ठाण मांडून बसल्याचे समजते .उपरोक्त घटना आज मंगळवार दि १४ नोव्हेंबरला वहानगांव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात घडली असून वाघाला बघण्यासाठी शेकडोंजण घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदरहु वाघ हा सहा ते सात वर्षाचा असावा असा एक अंदाज स्थानिक जनतेत वर्तविल्या जात आहे.