Home Breaking News Chandrapur dist @news • येत्या15 नोव्हेंबर पासून सुरू होतोय”आवाज सहज सुचलंचा...

Chandrapur dist @news • येत्या15 नोव्हेंबर पासून सुरू होतोय”आवाज सहज सुचलंचा ” 16 वा व्हाॅट्सअप गृप ! •मुख्य संयोजिकाची जबाबदारी चंद्रपूरच्या सोनाली इटनकर यांच्या कडे! •मराठी सिने अभिनेत्री मनिषा बि-हाडे , प्रख्यात लेखिका प्रांजल रायपुरे,पत्रकार स्नेहा मडावी व कु .किरण साळवींनी दिल्या नवनिर्मित गृपला शुभेच्छा!

108

Chandrapur dist @news

• येत्या15 नोव्हेंबर पासून सुरू होतोय”आवाज सहज सुचलंचा ” 16 वा व्हाॅट्सअप गृप !
•मुख्य संयोजिकाची जबाबदारी चंद्रपूरच्या सोनाली इटनकर यांच्या कडे!
•मराठी सिने अभिनेत्री मनिषा बि-हाडे , प्रख्यात लेखिका प्रांजल रायपुरे,पत्रकार स्नेहा मडावी व कु .किरण साळवींनी दिल्या नवनिर्मित गृपला शुभेच्छा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:कला,साहित्य ,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणारा व त्यांच्या कलागुणांना सदैव चालना देणारा महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंचा 16 वा व्हाॅट्सअप गृप बुधवार दि. 15 नोव्हेंबर पासून प्रारंभ होत आहे.या गृपच्या मुख्य संयोजिका चंद्रपूरच्या स्थानिक पठाणपूरा येथील मूळ रहीवाशी असलेल्या सामाजिक महिला कार्यकर्त्या सोनाली लटारु इटनकर ह्या आहे.सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मुख्य मार्गदर्शिका नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका मायाताई कोसरे व राजूरा निवासी अधिवक्ता मेघा धोटे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहज सुचलं (आवाज सहज सुचलंचा )असे नांव धारण करणाऱा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृप नव्याने सुरू करण्यात येत आहे.उपरोक्त गृपच्या संयोजिका सोनाली इटनकर ह्या महिला सामाजिक कार्यकर्त्या असून सदैव सामाजिक कार्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.धार्मिक ,प्रेमळ व शांत स्वभावाच्या असणा-या इटनकर ह्या गेल्या काही वर्षांपासून सहज सुचलं गृपवर कार्यरत असून कलाक्षेत्रात त्यांना अमाप आवड आहे. सामाजिक बांधिलकी जपणा-या याच गृपच्या सहसंयोजिका नाशिक जिल्ह्यातील शहापूरच्या महिला कार्यकर्त्या चैताली आतराम ह्या राहणार आहे.आजच्या घडीला सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपची (सर्व गृप मिळून )सदस्य संख्या पाच हजारच्या घरात आहे.हे येथे उल्लेखनीय आहे!

दरम्यान मराठी फिल्म अभिनेत्री मनिषा बि-हाडे, पुण्याच्या महिला पत्रकार स्नेहा मडावी,महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या मुख्य जेष्ठ मार्गदर्शिका उपराजधानी निवासी मायाताई कोसरे , चंद्रपूर प्रख्यात साहित्यिक अधिवक्ता मेघा धोटे, भद्रावतीच्या व्हॅर्च्युअस मल्टिपर्पज सोसायटीच्या संस्थापक अध्यक्ष कु.किरण साळवी, चंद्रपूर -गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्याच्या सहज सुचलं गृपच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक, सहसंयोजिका वर्षा कोंगरे, जागतिक पुरस्कार प्राप्त पाचवडच्या प्रख्यात कवयित्री कु. अर्चना सुतार , बारामतीच्या अश्विनी दीक्षित ,अकोल्याच्या प्रख्यात लेखिका प्रांजल रायपूरे व अन्य सदस्यगणांनी सोनाली इटनकर यांना नवनिर्मित आवाज सहज सुचलंचा सुरू करीत असल्या बद्दल शुभेच्छा दिल्या आहे.
येत्या १जानेवारीला सहज सुचलं गृप दहाव्या वर्षात थाटात पदार्पण करीत असल्याचे मायाताई कोसरे यांनी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन आज संध्याकाळी बोलताना सांगितले.