Home Breaking News Chandrapur dist@ news • महेंद्र ढूमणेंचा आम आदमी पक्षात प्रवेश

Chandrapur dist@ news • महेंद्र ढूमणेंचा आम आदमी पक्षात प्रवेश

53

Chandrapur dist@ news
• महेंद्र ढूमणेंचा आम आदमी पक्षात प्रवेश

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्यातील युवा नेते महेंद्र ढूमणे यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखाली व शंकर सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला आहे.

महेंद्र ढूमने म्हणाले की, आम आदमी पक्ष हा एकच पक्ष आहे जो खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठी काम करतो. दिल्ली, पंजाब आणि गोवा या राज्यांत आम आदमी पक्षाने केलेल्या कामांमुळे मी प्रभावित झालो आहे. त्यामुळे मी आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, महेंद्र ढूमणे एक अनुभवी आणि कार्यक्षम आहेत. त्यांचा पक्षात प्रवेश आम आदमी पक्षाला अधिक मजबूत करेल. त्यांच्या सोबत तेजस तिगुटला,वैभव पेचे,निलेश गायकवाड, गौरव पोहाकार,नेहल चिवडे, साहिल हजारे,सुरज मोरे, पवन म्हस्के,भवानी सिवी,संदीप वर्मा, जोशी,मयूर इंगळे,गोलू कनोजिया,भवानी बैस,शुभम इंगळे,मनीष इंगळे,सोनू चिवडे,साईराम बल्की,आशु केमेकर,सुजित वर्मा,सुरज कानोजिया,बबलू मानकर, सन्नी गिल,प्रवीण काळे,कृष्णा तीगुटला,सागर काळे,नंदू झाडे,चेतन पत्रकार, उदय तांड्रा,चिंटू पोगला,मंगेश मुंजेवार,नागेश गायकवाड,कैलाश गायकवाड,दिपक बहुरिया,आकाश भगत,अमित पोटे,अंकुश तडेल,अक्षय सोयाम यांनी प्रवेश केला. या वेळेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सुरज शाह,सुमित हस्तक,नितीन बावणे,गणेश आडे आदिं उपस्थित होते.