Home Breaking News Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी बसले...

Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी बसले चंद्रपूरात रस्त्यावर ठाण मांडून ! •आंदोलनाचा आज 31वा दिवस : शासन गप्पच ! •आंदोलनकर्ती छाया पाठकला मारला लकवा ; पाठकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू! •आंदोलनस्थळी आ.प्रतिभा देणार शनिवारी भेट ! •आंदोलन अधिक तीव्र करु आंदोलनकर्त्यांचा निर्धार

130

Chandrapur dist@ news
• रास्त मागण्यांसाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी बसले चंद्रपूरात रस्त्यावर ठाण मांडून !
•आंदोलनाचा आज 31वा दिवस : शासन गप्पच ! •आंदोलनकर्ती छाया पाठकला मारला लकवा ; पाठकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू!
•आंदोलनस्थळी आ.प्रतिभा देणार शनिवारी भेट !
•आंदोलन अधिक तीव्र करु आंदोलनकर्त्यांचा निर्धार

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे . आज या आंदोलनाचा 31वा दिवस आहे.दरम्यान या सुरू असलेल्या आंदोलनामूळे शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे सर्वत्र बोलल्या जाते. महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू असतांनाच चंद्रपूर जिल्हा आंदोलनात नियमित सहभागी होणाऱ्या सावली ब्लाॅकच्या परिचारिका छाया पाठक यांची अचानकपणे प्रकृती बिघडून त्यांना लकवा मारल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे विश्वसनिय सुत्रांने या प्रतिनिधीस आज सांगितले.उद्या शनिवारी भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर ह्या आंदोलन स्थळी भेट देवून आंदोलनकर्त्यांच्या मागण्यां जाणून घेणार असल्याचे रविन्द्र उमाठे यांनी शुक्रवारी संध्याकाळी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे राज्य शासनाने अद्याप लक्ष पुरविले नाही.त्यामुळे आंदोलनकर्त्यांत शासनाविरुध्द नाराजी पसरली असल्याचे एकंदरीत दिसून येते.दरम्यान याच आंदोलनकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी विविध प्रकारचे आंदोलन करुन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.परंतु अद्याप शासनाने लक्ष दिले नाही. त्यांच्या मागण्या रास्त असून शासनाने त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून त्या सोडव्याव्यात अशी मागणी आता सर्व स्तरावरून होवू लागली आहे.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे सुरू असलेले आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार या आंदोलनाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीचे मुख्य समन्वयक काॅम्रेड रविन्द्र उमाठे, डॉ.शिल दुधे, डॉ .अक्षय बुर्लावार, डॉ.तिरथ उराडे,डॉ.तुषार अगडे, डॉ.विनोद फूलझेले, काॅम्रेड प्रकाश रेड्डी, अधिवक्ता राम इंगळे, वनिता मेश्राम, आराधना झा, ललिता मुत्यलवार,जया मैंदळकर, शालिनी दुर्गे, रजनी धापटे, वैभव आत्राम, ज्योति आसुटकर,प्रकाश मामिडवार,सुरज डूकरे, डॉ.पुजा महेशकर, मर्सिस्टेला गजर , शिल्पा वाढई, डॉ.नितिन गायकवाड,अमरदिप पारखी, डॉ.ज्योति डांगे, शंकर संगमवार,त्रिरत्ना मेश्राम,व ज्योति तामगाडगे, भारती जुनघरे , श्रध्दा भगत , पुनम वावरे, ऐश्वर्या भागडे, दिपाली खिरडकर , राखी गेडाम,नेहा दूधे,पायल रोहणे, हर्षाली दुधपचारे, यांच्यासह आंदोलनात उतरलेल्या शेकडों अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे.