Home Breaking News Chimur taluka@news •मृत संगणक परिचालक व्यक्तींच्या कुटुंबीयांना चिमुर संगणक परीचालक संघटनेने दिला...

Chimur taluka@news •मृत संगणक परिचालक व्यक्तींच्या कुटुंबीयांना चिमुर संगणक परीचालक संघटनेने दिला मदतीचा हात

165

Chimur taluka@news
•मृत संगणक परिचालक व्यक्तींच्या कुटुंबीयांना चिमुर संगणक परीचालक संघटनेने दिला मदतीचा हात

✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, चिमूर

चिमूरः-संगणक परिचालक संघटना चिमूर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक २५ नोव्हेबरला कोरपना तालुक्यातील बीबी ग्राम पंचायत मधील आपले सहकारी संगणक परिचालक स्व. अनिल माटकर यांनी कंपनीच्या नाहक मानसिक त्रासला कटाळून व ईतर वेदनादायक त्रासातुन आपली जीवन यात्रा संपविली. त्या कुटुंबाला चिमूर तालुका संगणक परिचालक संघटनेनी आपल्या सहकार्यातुन जे शक्य होईल ते मदत करून आज त्यांची धर्मपत्नी व त्यांच्या परिवाराला सुपूर्द करण्यात येऊन त्यांच्या भविष्यातील अडीअडचणीच्या परिस्थितीवर साधक-बाधक चर्चा करून त्यांच्या पत्नीला संगणक परिचालक या पदावर कसे समाविष्ट करण्यात येईल किंवा त्याच्या कुटुंबाला कसा आधार देण्यात यावा याचा विचार करून ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सोबत सविस्तरपणे चर्चा करून पुढील मार्ग काढण्यात येणार आहे.

यावेळी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा चिमूर तालुका अध्यक्ष प्रशांत डवले चिमूर तालुका सचिव शैलेंद्र पाटील उपाध्यक्ष विकास खोब्रागडे, संजय शेडामे, सुनिल गुळधे. कोरपणा तालुका अध्यक्ष, निलेश कोवे, सचिन वनकर संगणक परिचालक, प्रवीण भाऊ पडवेकर, संगणक परिचालक अनिल कष्टी, संगणक परिचालक प्रदीप निरांजने, संगणक परिचालक, निशांत पिंपळकर संगणक परिचालक आधी सगणक परिचलक उपस्थित होते.