Chimur taluka@ news
• हिवाळी अधिवेशनात चिमूर
क्रांती जिल्हा घोषित करा: केशव वरखडे
• निवेदनाच्या माध्यमातून केली मागणी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिमूर याना दिले निवेदन
✍️शार्दूल पचारे
सुवर्ण भारतः तालुका प्रतिनिधी, चिमूर
चिमूर : – हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये चिमुर क्रांती जिल्हा घोषीत करण्याबाबत चे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर मार्फत एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री. अजीत पवार, उपमुख्यमंत्री,राधाकृष्ण विखे पाटील, महसुल मंत्री, यांना देण्यात आले.आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७५ वर्षे पुर्ण होत आहेत. ते स्वातंत्र्य मिळविण्यासाठी या शहराची फार मोलाची भुमिका आहे. चिमुरातील कित्येक स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देवुन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवुन दिले आहे. हे मात्र विशेष….
संपुर्ण भारत देश स्वातंत्र्य होण्यापुर्वीच चिमुर हे १६ ऑगस्ट १९४२ ला सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळालेले चिमुर हेच शहर आहे. चिमुर स्वातंत्र्य होण्याची बातमी सुभाषचंद्र बोस यांनी “बर्लीन” या रेडीओवर दिलेली होती. तसेच ९ ऑगस्ट १९४२ ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी “चले जाव” चा नारा दिला. वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या खंजेरीच्या भजनाने संपुर्ण चिमुर शहर पेटुन उठले व या क्रांतीतुन चिमुर शहर स्वतंत्र झाले.
चिमुर हे लोकसभा व विधानसभा क्षेत्र आहे. चिमुर लगतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे. तसेच दगडी कोळसा सुध्दा भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. चिमुर तालुक्याला वनसंपत्ती लाभलेली आहे. तसेच प्रेक्षणीय स्थळांमध्ये रामदेगी, मुक्ताई, सातबहिणीचे डोंगर, नवतळा येथील पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा लाभलेला आहे. तसेच चिमुर तालुक्यात भिसी, चिमुर व नेरी येथे हेमाडपंथी मंदिराचा वारसा लाभलेला आहे.
चिमुर या शहरापासुन चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया, वर्धा, यवतमाळ या प्रत्येक जिल्हयाचे अंतर १०० कि.मी. च्या वर असुन चिमुर हे शहर मध्य ठिकाणी उमा नदीच्या तिरावर वसलेले आहे. चिमुरची जनता स्वातंत्र्य लढयात ब्रिटीश सत्तेविरुध्द युध्द केले होते. त्यात चिमुरचे बालाजी रायपुरकर हे शहीद झाले व काहींना काळया पाण्याची सजा, फाशी व तुरुंगवास भोगावा लागला. चिमुर हे शहीदांच क्रांतीभूमी असुन स्वातंत्र्य चळवळीतील ऐतीहासिक शहर आहे. चिमुर जिल्हयाची मागणी मागील ४० वर्षापासुन होत असुन प्रशासकीय यंत्रणेद्वारे झालेल्या सर्वेनुसार चिमुर जिल्हयाचे नाव जिल्हा होण्यासाठी नविन जिल्हयाची यादीत समाविष्ठ आहे. जर चिमुर जिल्हयाची निर्मिती झाली तर येथे शासकीय कार्यालयासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे.
आमच्या विनंतीचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन मागील ४० वर्षापासून चिमुर क्रांती जिल्हा निर्मितीच्या मागणीला प्राधान्यक्रम देवुन हिवाळी अधिवेशन २०२३ मध्ये चिमुर जिल्हयाची विशेष बाब म्हणुन घोषणा करावी. हिच शहीदांना खरी श्रध्दांजली ठरेल. कृपया केलेल्या कार्यवाहीसंबंधी आम्हाला कळविल्यास आम्ही आपले आभारी राहू अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली गेली. यावेळी
केशवराव वरखडे, ग्रंथ मित्र सुभाष शेषकर, डॉ. संजय पिठाडे, केमदेव वाटगुरे, नरेंद्र दांडेकर, रामभाऊ खडसिंगे, श्रीहरी सातपुते, सुरेश डांगे, कुणाल मैन, प्रविण गजभिये, किशोर जांभुळे, अनिल कडवे, सुरेश डफ, मिलींद जांभुळे आदी समाजसेवक तथा गावकरी उपस्थित होते.