Bhadrawati taluka@news
• शितोरयु कराटे इंटरनॅशनल सेल्फ डिफेन्स ट्रेंनिग शिबिर
•८ ते १० डिसेंबरला भद्रावतीत आयोजन
✍️मनोज मोडक
सुवर्ण भारत :तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती- सन १९६७ पासून देशातील सर्वात प्राचीन व प्रथम कराटे स्कूलचा दर्जा प्राप्त एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चंद्रपूर जिल्हा व अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट द्वारा शितोरयु कराटे इंटरनॅशनल ट्रेनिग कॅम्प व ओपन सेल्फ डिफेन्स ट्रेंनिग कॅम्पचे आयोजन विश्वप्रसिद्ध मार्शल आर्टस् एक्स्पर्ट हंशी पी सुनील कुमार (ब्लॅक बेल्ट ८ डॉन), कोझीकोड (केरळ), रेंशी रॉबिन जोश (बंगलोर), शिहान कमल शर्मा (लुधियाना, पंजाब), सेन्सई दीपेश, सेन्सई अविनाश (केरळ) यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गुरुनगर परिसरातील आशीर्वाद सभागृह येथे ८ ते १० डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे.
शिबिरचे आयोजन एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनलचे संस्थापक प्रमुख दाई सेन्सई डॉ. मोसेस थिलक प्राचीन भारतीय मार्शल आर्टस् व कराटे खेळाचे भीष्मपितामह यांच्या प्रेरणेने सल्लागार अॅड. राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवर, निलेश गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली एलन थिलक कराटे स्कूलचे महाराष्ट्र प्रमुख रेंशी दुर्गराज एन रामटेके (ब्लॅक बेल्ट ५ डॉन), एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनलचे भद्रावती
तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अतुल कोल्हे, जिल्हा सहसचिव सेन्सई सॅम मानकर यांच्या पुढाकाराने या तीन दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात ६ वर्षावरील सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आव्हान एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनलचे जिल्हा पदाधिकारी व अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे, उपाध्यक्ष वाल्मिक खोब्रागडे, संस्थापक सचिव रेंशी दुर्गराज रामटेके, तालुकाध्यक्ष अतुल कोल्हे, शिहान मनीष सारडा, सेन्सई अंकुश आगलावे, सेन्सई बंडू करमनकर, सिनू रामटेके, मनीष भागवत, सेन्सई संदीप पंधरे, सेन्सई अमित मोडक, पांडुरंग भोयर, विकास दुर्योधन आदींनी केले आहे.