Korpna taluka@ news
•कोरपना येथे ८ डिसेंबरला अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे धरणा आंदोलन!
•रास्त मागण्यांसाठी करतात” ते ” आंदोलन!
सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज़)
चंद्रपूर :किरण घाटे
अंगणवाडी महिलांच्या ज्वलंत प्रश्नांना घेवून महाराष्ट्रभर ४डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू असून अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही.दरम्यान उद्या दि. ८ डिसेंबरला अंगणवाडी कर्मचारी संघटना कोरपनाच्या वतीने येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तहसिल कार्यालय कोरपना परिसरात दुपारी १२ ते ३ या वेळात धरणा आंदोलन करण्याचे ठरविले. राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस या पूर्वीच बेमुदत संपात सहभागी झालेल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना दर्जा देण्यात यावा , तोपर्यंत 26 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे ,राज्य विधि मंडळात दिलेल्या आश्वासनानुसार अंगणवाडी महिलांना मानधनांचे निम्मे पेन्शन देण्यात यावे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागू करण्यात यावी .अंगणवाडी मदतनीस यांना सेविकेच्या मानधनाच्या 80 प्रतिशत मानधन देण्यात यावे आदिं विविध मागण्यांच्या संदर्भात त्यांचा संप सुरु आहे.दरम्यान आज गुरुवारी कोरपनाचे तहसिलदार , बिडीओ व पोलिस निरीक्षक यांचे कडे कोरपना तालुक्यातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी एक लेखी निवेदन( धरणा आंदोलन व मागण्या बाबत)करण्या बाबत सादर केले आहे.या वेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष गुजाताई डोंगे, सचिव विमल जेणेकर , शोभा काकडे, कल्पना मांदोळे , सुनिता सुर , चंद्रकला झूरमुरे, मालू आकूलकर, मंजुषा मालेकर, यांच्या सह तालुक्यातील अनेक अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.