Home Breaking News Chandrapur dist@ news •महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल! ...

Chandrapur dist@ news •महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल! •डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला चप्पल लावून केले अभिवादन ; आंबेडकरी अनुयायांनी झाले संतप्त ! •चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल !

192

Chandrapur dist@ news
•महिला व बालविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल!

•डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला चप्पल लावून केले अभिवादन ; आंबेडकरी अनुयायांनी झाले संतप्त !

•चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल !

सुवर्ण भारत(पोर्टल न्यूज)
चंद्रपूर :किरण घाटे

राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा काल बुधवार दि.6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन होता.याच दिनी चंद्रपूरातील अनेक ठिकाणी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.मात्र चंद्रपुरातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मीना गिरडकर ह्या अधिकाऱ्यानी चक्क डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पायात चप्पल घालून माल्यार्पण करत अभिवादन केले.त्यामुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून त्यांच्या विरोधात उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली आज रामनगर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मीना गिरडकर या महिला अधिकाऱ्याने या आधी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले.त्यामुळे जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम त्यांच्याकडून होत असून अशा महिला अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी .यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा जनसमुदाय रामनगर पोलिस ठाण्यात जमा झाला.व या बाबतीत रितसर तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.  यावेळी राजू झोडे, संपत कोरडे, करूणा भगत,मेघा रिगणे,प्रतिभा मुन , सरिता रायपुरे,सपना बर्वे ,सारिका कामतवार,प्रतिमा पेन्दे, श्रद्धा अलोणे आदि अनुयायी उपस्थित होते .