Home Breaking News Mul taluka@ news •मूल तालुक्यात अवैध रेतीचे 2 ट्रॅक्टर जप्त •रेती माफियांचे...

Mul taluka@ news •मूल तालुक्यात अवैध रेतीचे 2 ट्रॅक्टर जप्त •रेती माफियांचे धाबे दणाणले

140

Mul taluka@ news
•मूल तालुक्यात अवैध रेतीचे 2 ट्रॅक्टर जप्त
•रेती माफियांचे धाबे दणाणले

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल: तालुक्यातील भादुर्णी घाटावर अवैधरीत्या रेतीची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडून ते तहसील कार्यालयात जमा केले असल्याचे समजते.दरम्यान या अवैध गौण खनिज प्रकरणात शुभम आकुलवार यांचेवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दिवसा ढवळ्या सर्रासपणे रेतीची वाहतूक करीत असल्याची गोपनिय माहिती महसूल प्रशासनाला मिळताच तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांचे मार्गदर्शनात कोतवाल संजय बावणे व सुरेश गेडाम यांनी सापळा रचून दोन्ही वाहतूक करणारे अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडले. सदरहु कारवाहीने मूल तालुक्यातील रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
या तालुक्यात अवैध गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक होत असल्यास त्यांचेवर धडक दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तहसीलदार होळी यांनी सांगितले.