Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा...

Chandrapur dist@ news • चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा -पुंडलिक गोठे यांची मागणी

128

Chandrapur dist@ news
• चंद्रपूर जिल्ह्यातील शिवनी रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करा -पुंडलिक गोठे यांची मागणी

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्या अंतर्गत येत असलेल्या शिवणी वनपरिक्षेत्रातील रोखलेखा खर्च प्रमाणकेची एसीबी व आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक जेष्ठ कार्यकर्ते पुंडलिक गोठे यांनी केली आहे.दरम्यान ते शिवनी येथील मुरलीधर गायकवाड व मूल निवासी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने वरिष्ठांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी काल या प्रतिनिधीस चंद्रपूर मुक्कामी सांगितले.उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी केल्यास गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.वरील प्रकरणा संदर्भात या आधीच चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे अनुक्रमे समर्थ व गायकवाड यांनी निवेदन देवून चौकशीची मागणी केली असल्याचे सर्वश्रूतच आहे.किती वर्षांपासून आधार सुशिक्षित बेरोजगार संस्थेशी या शिवनी वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालयचा संबंध आहे?असा सवाल उपस्थित करुन त्या संस्थेचे देखिल वर्षानिहाय संपूर्ण लेखापरीक्षण करण्यात यावे असे गोठे यांचे म्हणणे आहे.