Home Breaking News Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाला विराआस व जय विदर्भ...

Chandrapur dist@ news • अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाला विराआस व जय विदर्भ पार्टीचे समर्थन

115

Chandrapur dist@ news
• अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाला विराआस व जय विदर्भ पार्टीचे समर्थन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:राज्यभर सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचारी संघटना व मदतनीस यांच्या बेमुदत संपाला आज जय विदर्भ पार्टीचे नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चंद्रपूरचे विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या रास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे राठोड यांनी जिवती येथे अंगणवाडी सेविकांच्या बेमुदत संपाच्या ठिकाणी आज भेट दिली.तदवतच एक लेखी पत्र देऊन संपास जाहीर पाठिंबा दिला यावेळी ऍड. दीपक चटप, विशाल राठोड, नामदेव राठोड व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.