Home Breaking News chandrapur dist @news • वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालय शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी...

chandrapur dist @news • वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालय शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करण्याची मुरलीधर गायकवाड यांची मागणी! •वरिष्ठांकडे सादर केले निवेदन ! • उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी करा- दत्तात्रय समर्थ

137

chandrapur dist @news
• वनपरिक्षेत्र वनविभाग कार्यालय शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची चौकशी करण्याची मुरलीधर गायकवाड यांची मागणी!
•वरिष्ठांकडे सादर केले निवेदन !
• उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी करा- दत्तात्रय समर्थ

चंद्रपूर :किरण घाटे
सुवर्ण भारत (पोर्टल न्यूज)

चंद्रपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वन विभाग प्रादेशिक शिवनी कार्यालयाच्या रोखलेल्या खर्च प्रमाणकेची एसटीआय द्वारे चौकशी करावी अशी मागणी शिवणी येथील जेष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी एका लेखी निवेदनातून वरिष्ठांकडे केली आहे .उपरोक्त प्रकरणात निपक्षपाती व सखोल चौकशी झाल्यास अनेक गैरव्यवहार बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.दरम्यान ते लवकरच महसूल आयुक्त नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेवून या बाबत परत एकदा निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी या प्रतिनिधीस सांगितले.याच प्रकरणाच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी देखील चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचेकडे एक लेखी निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे.