Home Breaking News chandrapur dist news •अवैध रेतीचे केले ट्रॅक्टर जप्त ! •मंडळ अधिकारी...

chandrapur dist news •अवैध रेतीचे केले ट्रॅक्टर जप्त ! •मंडळ अधिकारी किशोर नवले व पटवारी कांबळेंची धडक कारवाई ! •रेती तस्करांत उडाली खळबळ !

110

chandrapur dist news
•अवैध रेतीचे केले ट्रॅक्टर जप्त !
•मंडळ अधिकारी किशोर नवले व पटवारी कांबळेंची धडक कारवाई !
•रेती तस्करांत उडाली खळबळ !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर:अवैध रेती तस्करांच्या विरोधात चंद्रपूर महसूल विभागाने चांगलीच कंबर कसली असून घूग्घूसचे कर्तव्यदक्ष मंडळ अधिकारी किशोर नवले व पटवारी कांबळे यांनी आज दि.२२जानेवारीला अवैध रेतीचे ट्रॅक्टर पकडून त्याचेवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी सदरहु वाहन नायब तहसिलदार कार्यालयात जमा केल्याचे वृत्त आहे.उपरोक्त अवैध रेतीचे वाहन नकोडा रेती घाटावर पकडल्याचे समजते.जिवाची पर्वा न करता मंडळ अधिकारी नवले व पटवारी कांबळे यांनी उपरोक्त अवैध रेतीचे ट्रॅक्टर मध्यरात्री पकडून सदरहु ट्रॅक्टरचा जप्तीनामा केला व ते पुढील कारवाईसाठी जमा केले.दरम्यान त्यांचे कारवाईचे अनेकांनी स्वागत केले आहे.गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती वाहतूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते.सोबतच जनतेच्या तक्रारी वाढल्या होत्या.अश्यातच रेती तस्करांवर मंडळ अधिकारी नवले यांनी नित्य पाळत ठेवली होती.शेवटी नवले यांच्या प्रयत्नाला आज यश आले.त्यांच्या या कारवाईमुळे रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे.