Home Breaking News Nagbhid taluka@ news • नागभीड येथे आयोजित भव्य मंगल कलश शोभायात्रेत नगरातील...

Nagbhid taluka@ news • नागभीड येथे आयोजित भव्य मंगल कलश शोभायात्रेत नगरातील महिला व पुरुष यांच्यासह असंख्य श्रीरामभक्तांचा सहभाग •’जय श्रीराम’, ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय…’ अशा गजरात राममय झाली नागभीड नगरी

78

Nagbhid taluka@ news
• नागभीड येथे आयोजित भव्य मंगल कलश शोभायात्रेत नगरातील महिला व पुरुष यांच्यासह असंख्य श्रीरामभक्तांचा सहभाग

•’जय श्रीराम’, ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय…’ अशा गजरात राममय झाली नागभीड नगरी

✍️अरुण रामुजी भोले
सुवर्ण भारत:नागभीड तालुका प्रतिनिधी

नागभीड : दि. 22 जानेवारी 2024 समस्त श्रीरामभक्त नागभीड नगरवासीयांच्या वतीने अयोध्येतील भव्य प्रभू श्रीराम मंदिर, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य मंगल कलश शोभायात्रेत सहभाग घेतला आणि ‛जय श्रीराम’ नामाचा गजर करत समस्त श्रीरामभक्तांचा उत्साह वाढविला. यावेळी मंगल कलशाचे पूजन करून भक्तिभावाने दर्शन घेतले.

या मंगल कलश शोभयात्रेची सुरुवात रेल्वे ग्राऊंड सुलेझरी पासून ते संपूर्ण नागभीड नगर भ्रमन करीत श्रीराम मंदिर सामूहिकरीत्या महापूजा-आरती करण्यात आली. शोभायात्रेत रथावर आरूढ झालेले बाल श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेत सर्व नागरिकांनी सहभागी झालेल्या श्रीरामभक्तांकडून दिलेल्या ‘जय श्रीराम’, ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय…’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर न्हाऊन गेला. या मंगल कलश शोभायात्रेत समस्त नगरवासीय श्रीराम भक्तगण मोठ्या संख्येने अयोध्या मधील राज्य भिसेक विडियो चौका चौकात पाहण्यासाठी भरमसाठ गर्दी केले होती, त्यानिमित्ताने महाप्रसाद ठिकठिकाणी वाटप करण्यात आले