Ballarpur city@ news
• वाहतूक पूर्ववत सुरू करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करु – राजू झोडेंचा प्रशासनाला इशारा
• बल्हारपूरच्या तहसिलदारांना दिले निवेदन
चंद्रपूर :किरण घाटे
अख्ख्या विदर्भात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या
बल्लारपूर नगरीतील अतिशय महत्वाच्या असलेल्या रेल्वे गोल पुलियाची वाहतूक मागील 15 दिवसांपासून बंद पडली आहे.त्यामुळे येथील वाहतूक तातडीने पूर्ववत सुरू करा अशी रास्त मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली आहे.दरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी बल्हारपूरच्या तहसिलदारांना एक लेखी निवेदन सादर केले आहे.
बल्लारपूर नगरीतील वस्ती भाग हा अत्यंत महत्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे.परिणामी मागील 15 दिवसांपासून गोल पुलियाची वाहतूक बंद करण्यात आली असून शाळेकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कार साठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे.त्यामुळे तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी मोकळा करावा अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. यावेळी चेतन गेडाम, संपत कोरडे, ईस्माइल कच्ची, श्याम झिलपे,बालकृष्ण कडेल ,गुरू कामटे, नितिन साठे, शंकर महाकाली, रेणूका कडेल, आदिं उपस्थित होते.
बल्लारपूर शहरातील हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असून या कडे स्थानिक तहसिलदार व नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे फार गरजेचे आहे.




