Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरूच !...

Chandrapur dist@ news • चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरूच ! •आजचा ७ वा दिवस! • राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खा.हंसराज अहीर व युवा तडफदार नेते महेश देवकतेंची आंदोलनस्थळी भेट •आदिवासी कोळी जमातीच्या मागण्यांची शासनाने घेतली नाही अद्याप दखल

302

Chandrapur dist@ news
• चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरूच !

•आजचा ७ वा दिवस!
• राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी खा.हंसराज अहीर व युवा तडफदार नेते महेश देवकतेंची आंदोलनस्थळी भेट
•आदिवासी कोळी जमातीच्या मागण्यांची शासनाने घेतली नाही अद्याप दखल

चंद्रपूर :किरण घाटे

आदिवासी कोळी जमातीचे राज्यव्यापी धरणे आंदोलन दि. 23 जानेवारी पासून सुरू झाले असून आज या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे . दरम्यान काल रविवार दि. २८जानेवारीला दुपारी १२वाजता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा चंद्रपूरचे माजी खासदार हंसराज अहीर , जिवती तालुकाध्यक्ष केशवराव गिरमाजी,जिवती भाजपाचे युवा तडफदार नेते महेश देवकते , गिरमाजी तुकारामवाड ,व संतोष जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या रास्त मागण्या जाणून घेतल्या तद्वतच त्यांनी या मागण्या संदर्भात त्यांनी त्यांच्याशी अर्धा तास पर्यंत सविस्तर चर्चा केली.स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक आदिवासी कोळी (जमात) बांधव बेमुदत धरणे आंदोलनात सहभागी झाले असून आंदोलनात स्त्रिया ,लहान मुले व विद्यार्थी देखील सहभागी झाल्याचे आंदोलनस्थळी भेट दिली असता आज दिसून आले.

केंद्र सरकारच्या 1976 च्या कायद्याची जशीच्या तशीच अमलबजावणी करावी. स्थानिक गृह चौकशी व रक्त नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र या आधारावर राजूरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र त्वरित द्यावे.वडिलांचे जात प्रमाणपत्र असून सुद्धा त्यांच्या मुलांना जात प्रमाणपत्र दिल्या जात नाही. राजूरा उपविभागीय अधिका-यांनी आदिवासी कोळी जमात बांधवास अधिक त्रास देणे तात्काळ टाळावे . आदिवासी कोळी जमातीचे जमात प्रमाणपत्र मिळण्यासंबंधी जिवती येथील तहसील कार्यालय व सेतू केंद्रांना प्रकरण दाखल करून घेण्यासाठी लेखी पत्र संबंधित विभागाने द्यावे.ह्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू असून जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य करून लेखी पत्र देत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असा इशारा आदिवासी कोळी समाजाचे आंदोलक ज्ञानोबा येलकेवाड, बाबू पुल्लेवाड, विश्वनाथ येंचेवाड,बालाजी पुल्लेवाड शिवाजी भोईनवाड, लक्ष्मण भोईनवाड, येलेबोईनवाड, निलेश घंटेवाड ,किरण चुंचूलवाड,आकाश देवरवाड, गणपत देवरवाड,काशिनाथ येंचेवाड, गोपीनाथ येंचेवाड,लक्ष्मण येंचेवाड,संभाजी पुट्टेवाड,बालाजी घंटेवाड ,बळीराम संबटवाड बालाजी येटेवाड,मारुती बोईनवाड ,अमृतवर्षा याटेवाड, गयाबाई गिरेवाड, भागुबाई मादसवाड,जनाबाई रेनेवाड,विश्वनाथ याटेवाड,ज्ञानेश्वर गुडमेवाड,प्रतिक येलेबोईनवाड, रमेश गुडमेवाड दिनेश चिंचूलवाड यांनी शासन व प्रशासनाला दिला आहे.