Chimur taluka@ news
• पारितोषिक वितरण समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रमासाठी सुपरिचित मराठी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी येत्या ३१ जानेवारीला चिमूर नगरीत!
चंद्रपूर :किरण घाटे
भाजप महिला आघाडीच्या वतीने येत्या ३१जानेवारीला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला फिल्म सृष्टीतील सुपरिचित मराठी कलावंत तथा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. आयोजित या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण तथा महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदरहु कार्यक्रम दुपारी १२वाजता चिमूर येथील अभ्यंकर मैदानावर होत असून महिलांनी मोठ्या संख्येंने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या माया नन्नावरे, वर्षा शेंडे, भारती गोडे व अन्य महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.
