Home Breaking News Chimur taluka@ news •चिमूर तहसील कार्यालयात आढावा बैठक • बैठकीला...

Chimur taluka@ news •चिमूर तहसील कार्यालयात आढावा बैठक • बैठकीला खा.अशोक नेते व आ.किर्तीकुमार भांगडीया यांची उपस्थिती

57

Chimur taluka@ news
•चिमूर तहसील कार्यालयात आढावा बैठक
• बैठकीला खा.अशोक नेते व आ.किर्तीकुमार भांगडीया यांची उपस्थिती

चंद्रपूर: किरण घाटे

आज चिमूरात एक आढावा बैठक पार पडली या बैठकीला खा.अशोकभाऊ नेते व आमदार कीर्तिकुमार भांगडीया प्रामुख्याने उपस्थित होते.
राजीव गांधी सभागृहात आयोजित या बैठकीत चिमूर तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकिय विभागाचा आढावा घेण्यात आला .बैठकीला तालुक्यातील सर्व शाखा प्रमुख उपस्थित होते.दरम्यान
बैठकीत तालुक्यातील विविध विकासकामे व समस्यां संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.तदवतच काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या.

सदरहु बैठकीला प्रामुख्याने चिमूरचे तहसीलदार राजमाने ,नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड ,पोलिस निरीक्षक राऊत,पोलिस निरीक्षक घारे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राठोड ,भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श्याम हटवादे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत चिडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, ओमप्रकाश गणोरकर, चिमूर कृ.उ.बा. समितीचे सभापती मंगेश धाडसे, भाजयुमो चिमूर शहराध्यक्ष बंटी वनकर, न.प.चे माजी सभापती/नगरसेवक सतीश जाधव ,अन्य पदाधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.