Home Breaking News Chandrapur city@ news • गोहणे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर ! • सेवानिवृत्त...

Chandrapur city@ news • गोहणे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर ! • सेवानिवृत्त महसूल सहाय्यक जयवंत गोहणे यांची प्राणज्योत मालवली !

251

Chandrapur city@ news
• गोहणे परिवारावर कोसळला दुःखाचा डोंगर !
• सेवानिवृत्त महसूल सहाय्यक जयवंत गोहणे यांची प्राणज्योत मालवली !

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्यातील अख्या महसूल विभागात शांत व प्रेमळ स्वभावाचा “जयवंत”म्हणून ओळख असणाऱ्या जयवंत नानाजी गोहणे यांची आज(बुधवार दि.३१जानेवारीला दुपारी १२वाजून १५ मिनिटांनी राजूरा निवासस्थानी प्राणज्योत मालवली. महसूल सहाय्यक म्हणून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल विभागात काम बघितले होते.काही काळ ते राजूरा तहसिल कार्यालयातील रेकॉर्ड रुमला कार्यरत होते.वयाच्या ५८व्या वर्षि ते याच कार्यालयातून २०२३ ला सेवानिवृत्त झाले होते.काही दिवसांपासून ते आजारी होते.औषधोपचार नियमित सुरू होता .परंतु आज मृत्यूशी झुंज देत असतानाच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.त्यांचे मागे पत्नी व दोन मुली आहेत.जयवंत गोहणे यांच्या दुःखद निधनाची बातमी कानावर येताच महसूल विभागातील अनेक कर्मचारी वर्गांनी व मित्रांनी त्यांचे निवासस्थानी भेट दिली.दरम्यान मंडळ अधिकारी संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र पचारे, पुरुषोत्तम कोमलवार, पटवारी सुनिल रामटेके, विरेंद्र मडावी, विल्सन नांदेकर यांनी दुःखवटा व्यक्त करीत दिवंगतास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.