Home Breaking News Chandrapur city@ news • EVM हटाव – संविधान और लोकशाही बचाव या...

Chandrapur city@ news • EVM हटाव – संविधान और लोकशाही बचाव या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रपती , निवडणूक आयुक्त व सर्वोच्च न्यायालय यांना निवेदन सादर !

122

Chandrapur city@ news
• EVM हटाव – संविधान और लोकशाही बचाव या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रपती , निवडणूक आयुक्त व सर्वोच्च न्यायालय यांना निवेदन सादर !

चंद्रपूर :किरण घाटे

EVM हटाओ -संविधान और लोकशाही बचाव या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रपती, मुख्य निवडणूक आयुक्त व मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार यांना आगामी काळातील सर्व निवडणुका EVM वर न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्या तसेच नागरिकांची मते चोरणाऱ्या EVM ला हद्दपार करावे अशा आशयाच्या मागणीचे एक लेखी निवेदन चंद्रपूरचे निवासी जिल्हाधिकारी संजय पवार यांना EVM हटाओ -संविधान और लोकशाही बचाओ जन आंदोलन समिती चंद्रपूरच्या वतीने आज बुधवार दि.३१जानेवारीला दुपारी ४ वाजता देण्यात आले.
या वेळी बळीराज धोटे,ऍड. फरहाद बेग,प्रा.माधव गुरनुले, प्रा. सुरेश लोणबले,इंजिनिअर सूर्यभान झाडे, प्रा. भाऊराव मानकर, प्रा.महादेव ढुमणे, भास्कर सपाट, पांडुरंग गावतुरे प्रा. सुरेश विधाते, प्रेमदास रामटेके, मुन्ना आवळे, प्रकाश रेड्डी, फिरोजकुमार भडके, दिलीप होरे, बाळू चांदेकर, महादेव गौरकार, विलास माथणकर, एम .व्ही .पुनवटकर, नवनाथ देरकर, यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

या आधी सुध्दा याच मागणीसाठी उपरोक्त समितीच्या वतीने चंद्रपूरातील जटपूरा गेट जवळ धरणे आंदोलन केले होते.हे चंद्रपूरकरांना सर्वश्रूतच आहे.