Chimur taluka@ news
• गनिमी कावा आंदोलन करणारच :अशिद मेश्राम
किरण घाटे:चंद्रपूर
गेल्या काही महिण्यांपूर्वी चिमूर नगर परिषदेला काग येथील काही समस्या व अडचणी सोडविण्यासाठी रोखठोक प्रहार कामगार संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.
कित्येकदा तोंडीही सांगितले. परंतु नगर परिषदेच्या मुख्याधिका-यांनी या गंभीर समस्यांकडे लक्ष पुरविले नाही त्यामुळे आपणांस गनिमी कावा सारखे आंदोलन करण्याची वेळ आली आहे.व ते मी येत्या १९फेब्रवारीला काग मुक्कामी करणारच असे स्पष्ट मत रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूरचे तालूका प्रमुख अशिद मेश्राम यांनी आज संध्याकाळी या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना व्यक्त केले.या आंदोलना बाबत रोखठोक प्रहार कामगार संघटनेने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी
व पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांना या पूर्वीच निवेदन सादर केले असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांनी आज पर्यंत निवेदनातील मागण्यांकडे लक्ष पुरविले नसल्याचा आरोप युवा नेता अशिद मेश्राम यांनी केला आहे.काग येथे स्मशानभूमीचे शेड नसून स्मशानभूमीकडे जाण्यायेण्यासाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा अश्या प्रकारच्या ब-याच मागण्यांकडे मेश्राम यांनी निवेदनातून लक्ष वेधले होते.परंतू सातत्याने चिमूर नगर परिषदेतील जबाबदार अधिकारी या कडे दुर्लक्ष करीत आहेत.
